Slide background
Slide background
Slide background
Slide background
Slide background
Slide background
Slide background
Slide background
Slide background
Slide background
Slide background

मिशन ओळख (Mission Introduction)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवताभूषण, समताभूषण, विश्वभूषण ठरावं असं भारतभूमीचं अनमोल रत्न! घटनाकार, ज्ञानवंत, किर्तीवंत, लढवय्या, समतायोद्धा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! डॉ. भीमराव रामजी आंबेडकर...

डॉ. बी. आर. आंबेडकर या महामानवाच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाच्या अलौकिकतेचा किती म्हणून गौरव करावा? शब्दच अपुरे पडणार..! त्यांच्या प्रकांडपांडित्याच्या विचारवैभवाचं इंद्रधनू नि त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमहात्म्य...! विद्वत्तेचं अद्भूत रसायन... ज्ञनाचा महासागर, आकाशाला गवसणी घालू पाहणाया चिंतनाचा महामेरू...समताधर्मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग्रंथलेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तत्त्वज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदर्श अध्ययनार्थी - विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशभक्त - राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंदोलक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्री उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीनिपूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृषितज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मचिकित्सक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ... अशा अनेक ज्ञानपैलूंनी पुनीत झालेलं हे प्रज्ञावंत देशवैभव व बहुजनदैवत!

त्यांच्या या बहुआयामी ज्ञानवैभवाची ओळख करून देणारी ज्ञानसंपन्न ग्रंथमालिका आम्ही प्रकाशित करण्याचा मानस देशभूषण नि समताभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त हाती घेण्याचे अभिमानास्पद धाडस केलं आहे. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आम मराठी जनतेला सादर केलेली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली ज्ञानांजली असणार आहे. येत्या एप्रिल/मे २०१६ मध्ये १२ पुस्तकांचा पहिला संच प्रकाशित करण्याचं ध्येय ठरविलं आहे.

बहुजननायक डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि विविधांगी पैलू समाजातील सर्व थरांमध्ये पोहोचविण्याचं हे मीशन आहे. अत्यंत अल्प विंâमतीत, अत्यंत दर्जेदार आणि नामांकित अभ्यासू संशोधक-लेखकांकडून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैलूंवर ग्रंथलेखन करून घेत आहोत. त्याला हवाय तुमचा भरघोस प्रतिसाद! पुâले - शाहू- आंबेडकरी विचारांच्या अनुयायांचे कृतिशील पाठबळ..! आपण हा आगळावेगळा ग्रंथप्रकल्प पाहून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाल याची खात्री आहे..! आपण या १२ पुस्तकांच्या संचाचं ‘अॅडव्हान्स बुकींग’ करून (तीन हजारांच्या ग्रंथसंचाची प्रकाशपूर्व किंमत रु. दोन हजार फक्त) आम्हास आपलं बळ द्या, एवढंच मागणं आहे.

To Top ↑